सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर- बल्लारपूर दिनांक १५ सप्टेंबर २०२४ वेळ-सकाळी १०.०० वाजता सुभाष हॉल नवीन बस स्टॉप च्या बाजूला मेन रोड बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर रोजी वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर- मुल – पोभूर्णा विधानसभा तर्फे बल्लारपूर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आला आहे. तरी वंचित बहुजन आघाडीचे चे निष्ठावंत कार्यकर्ते व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्त्यांना आवाहन आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मेळाव्यामध्ये सहभाग घ्यावा.
मेळावा चे कार्यक्रमाचे उद्घाटक मा.डॉ.निलेशदादा विश्वकर्मा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र वंचित बहुजन युवा आघाडी तसेच प्रमुख मार्गदर्शक मा.फारुख अहमद राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी, मा. डॉ.प्रा.निशा शेंडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी, मा.सविता मुंडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी, मा. शमीभा पाटील महाराष्ट्र राज्य सदस्य वंचित बहुजन युवा आघाडी, मा. खुशल मेश्राम महाराष्ट्र राज्य सदस्य वंचित बहुजन आघाडी सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

