prabodhini news logo
Home चंद्रपूर महाराजस्व अभियानात जिल्हाधिका-यांकडून विविध स्टॉलची पाहणी

महाराजस्व अभियानात जिल्हाधिका-यांकडून विविध स्टॉलची पाहणी

0
9

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 08 : तहसील कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने शहरातील मातोश्री विद्यालय येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी विविध स्टॉलची पाहणी करून शुभारंभ केला. तसेच या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना आमदार जोरगेवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, नागरिकांना शासकीय सेवा एक जागेवर मिळाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने महराजस्व अभियान सुरू केले आहे. चंद्रपूर तालुक्यातील हे पाचवे शिबीर आहे. यापूर्वीच्या घुग्गस व पडोली मंडळातील शिबिरात मोठ्या प्रमाणात लाभाचे वितरण करण्यात आले. तालुका महसूल प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने शिबिरे पार पाडली. यानंतर देखील चंद्रपूर नियमित शिबिरे आयोजित करावीत, जेणेकरून नागरिकांना जलद सुविधा मिळतील.

यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजू धांडे, ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते लाभार्भ्यांना प्रमाणपत्र वाटप : यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय येाजनांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत किसान लोणगाडगे, ऋषी निब्रड, वारलू सपाट, शंकर लोणगाडगे, प्रभाकर ताजणे यांना, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत सुशीलाबाई देहाळकर, सुधाकर भोंगरे, विशाल काळे, भारत काळे, कवडू तडस यांना राशनकार्ड लाभार्थ्यांमध्ये किरण शर्मा, कविता पुंड, विद्या जगताप यांना तर सजंय गांधी योजना / इंदिरा गांधी योजना / श्रावणबाळ योजनेंतर्गत तुळशीराम रामटेके, वेदांत गवळी, रमेश गुरुनुले, स्निग्धा मंडल, जीत मल्लीक, गोविंदराव कोडापे आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here