
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर: नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC) मार्च २०२५-२६ च्या परीक्षेचा निकाल लागला असून, बाबुपेठ येथील वियानी पब्लिक स्कूलने आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.यावर्षी शाळेतून एकूण १७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, एका विद्यार्थ्याने ९० टक्क्यांहून अधिक, तर दोन विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
शाळेतील गुणवंत विद्यार्थी:
प्रथम क्रमांक: ज्ञानदीप बी. पिंपरे (९१.४०%)
द्वितीय क्रमांक: अॅलेक्स अ. अँथोनी (८२.२०%)
तृतीय क्रमांक: प्रांजली एस. मेश्राम (८१.६०%)
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे माननीय मुख्याध्यापक फा. फ्रान्सिस मिंज, उपमुख्याध्यापिका मदर स्मिता आणि सर्व शिक्षकवृंदांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाला त्यांच्या शिक्षकांनी योग्य दिशा दिल्यानेच हे यश शक्य झाल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत..















