prabodhini news logo
Home चंद्रपूर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा

0
22

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिळणार लाभ

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 15 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ‘मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणे’ या योजनेत बदल करण्यात आला आहे. सदर योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी बचत गटाला देण्यात येणारे (अर्थसहाय्य) हे वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्य 3 लक्ष 15 हजार रुपये हे बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती : 1) स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे.

2) गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्यासह किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत. 3) राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदर खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न करावे. 4) स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारचे ministry of agriculture, & farmers welfare department of og agriculture, co-operation and farmers welfare, यांनी निर्धारित केल्यानुसार फार्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टिंग इन्स्टिट्यूट यांनी टेस्ट करून जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमांणानुसार असावेत. 5) ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी पॉवर ट्रिलर योजनेचा लाभ घेतला आहे, त्या बचत गटांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहाय्यक आयुक्त, समाज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपुर येथे संपर्क साधून अर्ज सादर करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here