
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 22 : राज्य शासनाच्या वतीने सर्व धर्मीयांतील 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेली 25 मे रोजीची यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी 25 मे ते 30 मे या कालावधीत बिहार राज्यातील महाबोधी मंदिर, बुद्धगया येथे तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव लाभार्थ्यांना घेऊन जाणारी ही यात्रा सध्या स्थगित करण्यात आली असल्याची माहिती समाजकल्याण विभागाने दिली आहे.
यात्रेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून संबंधित लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.















