
बापुसाहेब घोडेस्वार
उपजिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
9665216521
अहमदनगर – जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता 6 वीत शिकणार्या मुलीची छेडछाड करणाऱ्याला पॉस्को सह विनयभंगाचे कलमान्वये पाच आरोपी विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पौर्णिमा ऊर्फ पुनम मनोज मोरे वय 25 वर्ष शिक्षण 9 वी, धंदा शेती व घरकाम, रा. डोणगाव ता. जामखेड जि. अहमदनगर
समक्ष पोलीस ठाण्यात हजर होऊन लेखी फिर्याद दिली आहे नवरा मनोज भीमरास मोरे, सासरे भिमराव उमाजी मोरे, सासु शोभा तसेच दोन मुली 1) दिव्या उर्फ संध्या वय 12 वर्ष 2) अनविता वय 9 वर्ष मुलगा अनिकेत वय 10 वर्ष यांचेसह राहण्यास आहे. यांची डोणगाव गावचे शिवारात यांची शेतजमीन आहे.
यांची मुलगी दिव्या ऊर्फ संध्या हिची जन्म तारीख 16/03/2012 अशी असुन ती सध्या जि.प.प्राथमिक शाळा डोणगाव ता. जामखेड येथे इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत आहे. यांच्या घरापासून सुमारे 500 मीटरवर आमचे समाजातील दादासाहेब मारुती धनवे हे त्यांची बायको व दोन मुले नाव कृष्णा व आकाश यांचेसह राहत आहेत.
आज दि.12/07/2023 रोजी सायंकाळी 05. 30 चे सुमारास पूनम मोरे त्यांच्या शेतातुन जनावरांना चारापाणी करून राहते घरी आले. त्यावेळी मुलगी दिव्या ऊर्फ संध्या ही रडत होती. त्यामुळे मी दिव्या ऊर्फ संध्या हिस का रडत आहे, असे विचारले असता तिने सांगितले की, आज शाळा सुटल्यावर मी व माझ्या मैत्रिणी प्रगती अंगत धनवे व काजल सतिश मोरे यांचे सोबत आपल्या गावातील खंडोबाच्या मंदीरात पाया पडायला गेलो होतो. त्या ठिकाणी आकाश दादासाहेब धनवे याने माझा हात धरून ओढले व तु मला खुप आवडते असे म्हणाला तसेच आकाश याने, चार पाच दिवसा पूर्वी मला डोळा मारला होता. असे मुलगी दिव्या उर्फ संध्या हिने आईला सांगितले त्यावेळी ती खुप घाबरलेली होती.
काही वेळाने पुनम मोरे यांचा नवरा घरी आल्यावर त्यांना मुलगी दिव्या उर्फ संध्या हिने घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर सायंकाळी 07:30 च्या सुमारास पुनम त्यांचा नवरा व दीर निखील भिमराव मोरे तसेच सासरे भिमराव मोरे असे सर्वजण दादासाहेब धनवे यांचे घरी जाब विच्यारण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी असलेले दादासाहेब मारुती धनवे, कृष्णा दादासाहेब धनवे, विशाल प्रकाश मोरे , प्रकाश गोरख मोरे सर्व रा. डोणगाव ता. जामखेड असे सर्व जणांनी यांचे काही ऐकून न घेता हातात काठ्या घेऊन त्यांच्या अंगावर धावुन आले तसेच शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून माघारी घरी गेले काही वेळ घरी थांबुन पूनम मोरे यांचा नवरा व मुलगी दिव्या उर्फ संध्या असे सर्वजण फिर्याद देण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनला आले.
आकाश दादासाहेब धनवे याने आज दि.12/07/2023 रोजी सायंकाळी 05:30 वा चे सुमारास आमचे डोणगाव गावातील खंडोबा मंदिरात माझी मुलगी दिव्या उर्फ संध्या वय 12 वर्ष हिचा हात धरून तिला ओढुन तु मला खुप आवडते असे म्हणून तसेच त्यापुर्वी डोळा मारून तिचा विनयभंग केलेला आहे. तसेच मी व आमचे घरातील लोक
दादासाहेब धनवे यांचे घरी जाब विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी आमचे काही एक ऐकून न घेता हातात काय घेऊन आमचे अंगावर धावुन आले तसेच शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे. करीता माझी आकाश दादासाहेब धनवे, दादासाहेब मारुती धनवे, कृष्णा दादासाहेब धनवे , विशाल प्रकाश मोरे , प्रकाश गोरख मोरे सर्व रा. डोणगाव ता. जामखेड यांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे.
पोर्णिमा ऊर्फ पुनम मनोज मोरे यांनी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस श्रीमती स्वाती जानेवाड यांचे समोर दिली आहे.














