
प्रशांत रामटेके
संचालक
प्रबोधिनी न्युज
मध्यप्रदेश – देशभरात टोमॅटो च्या किमती गगणाला भिडल्या असून बहुसंख्या घरात दैनंदिन जेवणातून टोमॅटो गायब झाला आहे. टोमॅटो च्या वाढलेल्या किमतीमुळे एक बायको नवऱ्याला सोडून घरातून निघून गेली.ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील शहादोल जिल्ह्यात घडली आहे.
http://www.prabodhininews.com/?p=26944
संजीव बर्मन याचा टिफिन सर्विसेस चा व्यवसाय आहे.त्याने घरी जेवण बनवीत असतांना 2 टोमॅटो वापरले होते.यावरून त्याच आणि त्याच्या बायकोच कडाड्याचं भांडण झालं होत. न विचारता जेवणात 2 टोमॅटो वापरल्याने संजीव ची बायको त्याच्यावर भडकली होती.भांडण सुरु असतांना संजीव ची बायको उठली आणि तिने आपल्या मुलीला सोबत घेऊन घराबाहेर गेली आणि ती परत आलीच नाही.
http://www.prabodhininews.com/?p=26970
संजीव ने या दोघींना शोधण्याचा बराच प्रयत्न केला मात्र दोघी कुठेही सापडल्या नाहीत.यामुळे त्याने पोलीस स्टेशन ला धाव घेतली आणि बायकोसह मुलीने घर सोडले असून दोघी सापडत नसल्याची तक्रार दिली.पोलिसांनी तक्रार दाखल केली असून त्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली.
http://www.prabodhininews.com/?p=26905
पोलिसांनी सदर वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी म्हटलं आहे की संजीव ने भाजीमध्ये 2 टोमॅटो घातले होते, ज्यामुळे त्याची बायको भडकली होती.या रागाच्या भरात बायको घर सोडून निघून गेली. पोलिसांनी संजीव ला त्याची बायको आणि मुलगी शोधून देऊ आणि तुझ्या घरी आणून सोडू असं आश्वासन दिल आहे..
http://www.prabodhininews.com/?p=26966
http://www.prabodhininews.com/?p=26956
http://www.prabodhininews.com/?p=26908
http://www.prabodhininews.com/?p=26913














