prabodhini news logo
Home ठळक बातम्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

0
77

नरेश गजभिये
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क

अनंत श्री विभूषित जगद्गुरू नरेन्द्राचार्य महाराज दक्षिण पीठ नानिजधाम ता. जी. रत्नागिरी च्या वतीने भंडारा जिल्ह्यात अपघाग्रस्तांच्या मदतीकरिता 24 तास अविरत मोफत सेवा देण्याच्या *लोककल्याणकारी उदात्त हेतूने “रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा “दिनांक 16/7/2023 रोज रविवारला सकाळी ठीक 10.00 वाजता वृंदावन लॉन, खात रोड, भंडारा येथे मा. *श्री. योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी भंडारा यांच्या शुभहस्ते मा.श्री. लोहित मतानी पोलिस अधीक्षक भंडारा, यांच्या अध्यक्षतेखाली, मा श्री. डॉ दिपचंद सोयाम जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय भंडारा, मा श्री. सतीश जाधव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भंडारा, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे संस्थान च्या वतीने समाजाच्या सेवेकरिता मोफत 24 तास महाराष्ट्रा मधील विविध महामार्गावर आजतागायत 42 रुग्णवाहिका मोफत सेवा देत आहे.
या कार्यक्रमाला पूर्व विदर्भ उपपीठ प्रमुख मा. राजेंद्र भोयर, पीठ व्यवस्थापक मा श्री प्रवीण परब, पीठ कमेटी सदस्य मुन्नालाल मोटघरे सर्व पीठ कमेटी सदस्य पूर्व विदर्भ पीठ यांची उपस्थिती लाभणार आहे.
रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा भंडारा अंतर्गत सर्व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, भक्तगणांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा निरीक्षक सुरेश लाखे, जिल्हा अध्यक्ष संतोष भुरे सर्व जिल्हा पदाधिकारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा भंडारा यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here