prabodhini news logo
Home ठळक बातम्या झरी तालुक्यातील मार्कि येथे शिक्षकाविणा शाळा

झरी तालुक्यातील मार्कि येथे शिक्षकाविणा शाळा

0
58

संघर्ष भगत
झरि तालुका प्रतिनधी

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यातील मार्कि (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांच मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे.सद्या जिकडेतिकडे शाळा सुरू झाल्या 90 ते 100 विद्यार्थी सुद्धा रोज वेळेवर शाळेत येत असतात. मात्र वर्गात गेल्यावर शिक्षकच नसल्याने आता शिकवणार तरी कोण असा प्रश्न विद्यार्थ्यांना व पालकांना पडला आहे.या संदर्भात जिल्हा शिक्षण अधिकारी यांना 4 जुलै 2023 रोजी निवेदन सुद्धा देण्यात आले. मात्र आजून पर्यन्त कोणताही शिक्षक शाळेवर हजर झाला नाही. म्हणूनच आज सर्व विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या पालकांसोबत सर्व गावकरी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे जाऊन निवेदन देणार आहे. व शिक्षकच नसेल तर विद्यार्थी घडेल तरी कसा व शिक्षक जर आला नाही तर काही तरी वेगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही करणार असे पालकांकडून बोलण्यात येत आहे व आमच्या चिमुकल्यांना चांगला गुरू मिळावा यासाठी प्रशासनाकडे मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here