prabodhini news logo
Home ठळक बातम्या जय जगन्नाथ मंडळातर्फे दानशूर गुणवंताचा सत्कार सम्पन्न

जय जगन्नाथ मंडळातर्फे दानशूर गुणवंताचा सत्कार सम्पन्न

0
66

स्वप्निल रा. मोहितकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

भद्रावती.. तारीख सोळा हात जोडा हे ब्रीद फक्त मनात न ठेवता सदगुरू जगन्नाथ महाराज यांचे भक्तिमार्गातून सामाजिक दायित्व पार पाडण्याचा संकल्प गवराळा वॉर्ड भद्रावती येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळाचे वतीने करण्यात आला.
याप्रसंगी मंडळाचे नवनियुक्त दानशूर अध्यक्ष श्री. बबन पा. डोये यांचे आर्थिक व भौतिक सुविधा देऊन निस्वार्थ योगदान दिल्या बद्दल विशेष सहपत्नीक सन्मान करण्यात आला. तसेच धनोजे कुणबी समाज भूषण गणेश डोंगे यांनी प्रतिकूल परिस्थिती वर मात करून सिनेसृष्टीत एक उत्तम कला दिग्दर्शक स्थान निर्माण केले तसेच भद्रावती सारख्या शहरात, संसारचक्र या लघु चित्रपटाची निर्मिती करून स्थानिक कलाकारांना अभिनयाचीसंधी दिली याबद्दल त्यांचाही सहपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रसंगी नवनियुक्त पदाधिकारी महादेव डोंगे पांडुरंग कोयचाडे, सुर्यभानजी परचाके, गोपाल चन्ने अरुण येरकाडे उमेश उरकुडे,विनोद सावनकर देवरावजी सातपुते शामरावजी नक्षीने,यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे सचिव प्रभाकर निमकर जेष्ठ मार्गदर्शक बबनराव जीवतोडे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मंडळाच्या कार्यास सामाजिक हेतू व्यतिरिक्त कोणताही राजकीय रंग असणार नाही हे लिमेश माणुसमारे यांनी स्पष्ट केले. आभार प्रदर्शन अनिल ढेंगळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मधुकर सावनकर, अशोक गोवारदिपे,विलास खापणे,किशोर ठाकरी विठू मशिरकार, प्रवीण निमकर, बंटी यादव, मंगेश डोंगे, बंडू भादेकर,मधुकर हजारे ,वसंतराव उदे संजय वाढई ,सुधीर सावनकर,चेतन भुसारी ,मधुकर सावनकर ,सुदर्शन डोये यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here