prabodhini news logo
Home ठळक बातम्या नेर ग्रामपंचायत प्रांगणात “मेरी मिट्टी मेरा देश” कार्यक्रम संपन्न..

नेर ग्रामपंचायत प्रांगणात “मेरी मिट्टी मेरा देश” कार्यक्रम संपन्न..

0
69

धुळे तालुका प्रतिनिधी
संकेत प बागरेचा
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
7218771539

नेर ता.धुळे नेर ग्रामपंचायत मार्फत “मेरी मिट्टी मेरा देश” कार्यक्रम ग्रामपंचायत प्रांगणात संपन्न झाला.यावेळी ग्रामपंचायत प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमप्रसंगी न्यू इंग्लिश स्कुल व आर्ट्स कॉमर्स ज्यू.कॉलेज नेर शाळेचे मुख्याध्यापक श्री.नवल पाटील,जेष्ठ शिक्षक शौकतमियाँ जहागीरदार तसेच जि.प. शाळा यांनी नेर गावाच्या सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल, ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे, अपर्णा जोशी केंद्रप्रमुख नेर बिट,यांच्या हातात मातीच्या कलशात माती देऊन “मेरी मिट्टी मेरा देश” कार्यक्रम यशस्वी केला.तसेच ग्रामपंचायत नेर तर्फे गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.

यावेळी गावातील विविध सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, जि. प.प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक रामभाऊ पाटील यांनी केले.आभारप्रदर्शन प्राथमिक शिक्षक योगेश कोळी यांनी केले.

फोटो कॅप्शन
न्यू इंग्लिश स्कुल व आर्ट्स कॉमर्स ज्यू.कॉलेज नेर शाळेचे मुख्याध्यापक नवल पाटील समवेत जि.प.शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका नेर गावाच्या सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल,ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे, अपर्णा जोशी केंद्रप्रमुख नेर बिट, यांच्या हातात मातीच्या कलशात माती देतांना छायाचित्र…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here