
हिंगोली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
हिंगोली :- सामाजिक न्याय विभागाच्या बार्टी अंतर्गत मागील नऊ वर्षापासून समतादूत शासनाच्या जनकल्याणकारी विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे राबवण्याचे अविरतपणे कार्य करीत असतांना . मात्र अनेक वेळा बार्टी समतादुतांनी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करूनही 9 वर्षात समतादूतांना 1 रुपयाची ही वाढ देऊन न्याय मिळत नसेल तर गंभीर बाब आहे.
समतादूतांचे (कंत्राटी ) मानधन वाढ व समाजकल्याण विभागात कायम समायोजन करावे यासाठी समतादूतांनी वेळोवेळी शासन दरबारी, मंत्री महोदयांना मंत्रालयात ही निवेदनाद्वारे मागणी केली समतादूतांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रालय कक्ष अधिकारी प्र.वि. देशमुख यांनी 27 डिसेंबर 2022 रोजी महासंचालक बार्टी यांना समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये शासन सेवेत समायोजन करण्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते.त्यानुसार बार्टी मुख्यालयाद्वारे दिनांक 18 मे 2023 रोजी प्र.वि.देशमुख कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई यांना समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये समायोजन करण्याबाबत 114 पाणी स्वयंस्पष्ट सकारात्मक अहवाल शासनास सादर केला,
तालुकास्तरावर शासनाची अशी कुठलीही यंत्रणा नसतांना समतादूत प्रभाविपणे शासनाची कामे वेळेत करीत असतात, समतादूत यांना समाजकल्याण विभागामध्ये शासन सेवेत समायोजन केल्यास त्याचा लाभ समाजातील अनुसूचित जाती,वंचित घटकांना होईल हे अहवालामध्ये स्पष्ट नमूद आहे. शासन ही सकारात्मक आहे,परंतु समतादूत यांचे शासन सेवेमध्ये समायोजन याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने आपल्या न्याय हक्कासाठी राज्यातील सर्व समतादूतांचा 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून बार्टी मुख्यालय पुणे ते मुंबई मंत्रालय पायी लॉंग मार्च सुरु आहे. अनेक महिला मुलं बाळ घेऊन सहभागी झालेत, काहींची प्रकृती बिघडली असून शासनाने लक्ष देऊन लवकर न्याय मिळवून द्यावा.
राज्याचे मुख्यमंत्री मंत्री महोदय निश्चित न्याय मिळवून देतील या अपेक्षेने विविध ठिकाणी पुरुष महिला सामाजिक कार्येकर्ते सहभागी होत सामाजिक संघटना, जनसामान्य स्तरातून समतादूताच्या पायी लॉंग मार्च चे देहू येथे स्वागत करण्यात आले. माय बाप सरकार समतादूतांना निश्चित न्याय देईल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.














