
कपिल एस. मेश्राम
ता.प्रतिनिधी, सिंदेवाही
मागील अनेक दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून दुसरा जिल्हा निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्या प्रमाणे कार्यवाही सुरू आहे. जिल्हा निर्मीती साठी अनेक तालुके अग्रेसर राहून मागणी करीत आहेत. नविन जिल्हा निर्माण करतांना त्या जिल्ह्यात समाविष्ठ होणाऱ्या गावातील नागरिकच्या सोईसुविधाचा सुध्दा विचार होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे ठिकाण हे सर्व तालुक्यांच्या मध्यवर्ती असणे आवश्यक आह अशावेळी सिंदेवाही हेच एकमेव मध्यवर्ती ठिकाण आहे सिंदेवाही शहराच्या पुर्वेला सावली तालुका 30 किलोमिटर वर पश्चिमेला चिमुर तालुका 40 किलोमीटर दक्षिणेला मुल तालुका 27 किलोमीटार उत्तरेला नागभिड तालुका 35 किलोमीटर व पुढे ब्रम्हपुरी तालुका 50 किलोमिटर अशी भौगोलीक स्थिती आहे. जिल्हा निर्मीती साठी सिंदेवाही शहरात जागा उपलब्ध आहे. दळणवळणासाठी रेल्वे स्टेशन व राज्य महामार्ग आह अशाप्रकारे सिंदेवाही शहर जिल्हा निर्मीती साठी योग्य व मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणुन सिंदेवाही हाच नविन जिल्हा निर्माण करावा अशी परिसरातील जनतेची आग्रहाची मागणी आहे तरी या सर्व बाबीचा सर्वे व अभ्यास करून मगच नविन जिल्हा करावा आणि तो सिंदेवाहीलाच करावा अशी मागणी सिंदेवाही जिल्हा कृती समितीने निवेदनाव्दारे करण्यात आली
कोणत्याही भावनेच्या आहारी कृपया सरकारने जावू नये आणि सर्व सामान्य जनतेला गैरसोईचे होईल अशा शहराला जिल्हा निर्मीती करण्यात येवु नये मध्यवर्ती शांत व सभ्य शहर म्हणून नाव असलेल्या सिंदेवाही शहरालाच नविन जिल्हा घोषित करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.














