prabodhini news logo
Home जळगांव शेतकरी कामगारांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन माथाडी मैदानात

शेतकरी कामगारांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन माथाडी मैदानात

0
120

जळगाव प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

जळगाव- भडगाव तालुक्यातील जीवाढली गावचे पीडित कुटुंब सुखमाबाई गौतम अहिरे, आशा गौतम अहिरे, समाधान गौतम अहिरे, या पीडित कुटुंबांनी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे बालाजी महादेव पठाडे (जळगाव जिल्हा अध्यक्ष) यांना आली तक्रार. मराठा समाजाचे राजेंद्र मधुकर पाटील यांनी जबरदस्ती महार वतन शेतीवर ताबा करून पीडित अहिरे कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या शेती वरून केले वंचित, पीडित अहिरे कुटुंब यांची कोर्टामध्ये केस चालू असताना राजेंद्र मधुकर पाटील यांनी दिली जीवे मारायची धमकी “६ लाख रुपये घे आणि शेत मोकळकर अन्यथा तुझ्या कुटुंबांना कुठे गायब करेल ते कळणार नाही” अशी शाब्दिक धमकी देण्यात आले, परंतु असे कोणतेही अपराध गुन्हा घडू नये त्याकरिता वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन च्या वतीने बालाजी महादेव पठाडे (जळगाव जिल्हाध्यक्ष), प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक) व पै.अण्णा मोरे (भडगाव तालुका अध्यक्ष) यांच्या उपस्थित राजेंद्र पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक भडगाव) यांना समक्ष भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले. व अहिरे कुटुंबातील कोणाच्याही जीवाला धोका निर्माण झाला तर जबाबदार राजेंद्र मधुकर पाटील, मधुकर पाटील, रामा पाटील, सुखदेव पाटील हे असतील, व या गोष्टीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी असं न झाल्यास वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने भडगाव पोलीस स्टेशन वर जिल्ह्याच्या वतीने आंदोलन घेऊ, असे निवेदन राजेंद्र पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here