prabodhini news logo
Home चंद्रपूर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली मधुबन अॅग्रो टुरिझमला भेट

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली मधुबन अॅग्रो टुरिझमला भेट

0
98

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे नुकतेच गडचिरोली जिल्ह्यात दौऱ्यावर गेले होते. तिथुन परत येत असताना त्यांनी आरमोरी-गांगलवाडी टी पाईंट वरील मधुबन अॅग्रो टुरिझम व रेस्टॉरंटला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण अॅग्रो टुरिझमच्या परीसरात फेरफटका मारत माहिती जाणून घेतली. व रेस्टॉरंट मधील जेवणाचाही आस्वाद घेतला. यावेळी मधुबन अॅग्रो टुरिझमचे संचालक पप्पू कुथे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना माहिती दिली. तेव्हा त्यांनी अॅग्रो टुरिझम सारखा नवीन व्यवसाय एकदम व्यवस्थित सुरू केल्याबद्दल अभिनंदन करीत कौतुकही केले.

आरमोरी-गांगलवाडी टी पाईंटवर वैनगंगा नदीच्या काठावर मधुबन अॅग्रो टुरिझम हे 4 एकराच्या विस्तीर्ण परिसरात वसलेले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात हे ठिकाण असुन याठिकाणी असलेल्या विविध प्रकारची हिरवेगार झाडे व विशिष्ट आकार लाभलेली आंब्याची झाडे ही नागरिकांची मने आकर्षित करत असतात. सोबतच याठिकाणी चुलीवर बनवलेल्या भाकरी व इतर खाद्यपदार्थ हे देखील चवीदार असल्याने नेहमीच या मधुबन अॅग्रो टुरिझम मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. विशेषत: सायंकाळचा वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्यासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागांतून याठिकाणी नागरिक आपल्या कुटुंबियांसोबत याठिकाणी येत असतात. याठिकाणी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी देखील विविध देखावे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत हे दौऱ्यावर असतांनाच त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना मधुबन अॅग्रो टुरिझम बद्दल कल्पना दिली. तेव्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मधुबन अॅग्रो टुरिझमला भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here