मेळघाट अतिदुर्गम भागात स्त्री शक्ति मंच संघटनेच्या अध्यक्ष शारदा भुयार यांच्या पुढाकाराने गरिबांसाठी प्रेमाची भेट मेळघाट भागात जाऊन गरिबांसाठी प्रेमाची भिंत अंतर्गत प्रेमाची भेट

0
83

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

स्त्री शक्ती मंच संघटनेच्या अध्यक्षा शारदा अतुल भुयार यांच्या पुढाकाराने मेळघाट अतिदुर्गम भागात जाऊन गरीबांसाठी प्रेमाची भिंत अंतर्गत प्रेमाची भेट नवीन ब्लँकेट, साडी, फराळाचे वाटप गरीबांना करण्यात आले. शारदा भुयार ह्या कित्येक वर्षांपासून गरीबांची दिवाळी साजरी करतात स्त्री शक्ती मंच संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. परंतु या वर्षी त्यांनी महिलांना प्रथमच कारंजा लाड मधुन मेळघाटातील अतिशय दुर्गम भागात जाऊन आल्या नी दाखवुन दिले आम्ही प्रेमाची भिंत कुठेही बांधु शकतो. हे स्त्री शक्ती मंच संघटनेच्या माध्यमातून वंचिताची दिवाळी साजरी केली. कारजा लाड शहरातुन पहिली महिलांची चमु अतिदुर्गम भागात जाऊन आली हे विशेष दुसरी टीम काही दिवसांत परत जात आहे.
स्त्री शक्ती मंच संघटनेच्या अध्यक्षा शारदा अतुल भुयार, संघटनेतील कार्यकर्त्या तालुका संघटिका राधा मुरकुटे, संघटनेच्या कृपा ठाकरे सदस्या, अनिता राऊत सदस्या, सुभाषी रंगदळ सदस्या यमुना राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले. दिवाळी निमित्त अनेकांनी मदतीचा हात पुढे केला जे जमेल ते सढळ हाताने मदत केली.
अँड. संदेश जिंतूरकर, सुराना किराणा, पुणम ठाकुर, विद्या पवार, शीला चिवरकर,राधा मुरकुटे, मोनाली मुरकुटे,या सर्वांनी कपडे, भांडे, फराळाचे पदार्थ, दिले. ईतर लोकांनी सहकार्य केले.,
बिहाली, घंटाग या दोन गावांमध्ये वाटप करण्यात आले. दोन्ही गावातील लोकांनी सहकार्य केले.
मेळघाटातील बिहाली येथील सरपंच बददु कासदेकर, वनरक्षक आर. यु. मकेश्वर घंटाग गावातील वनरक्षक अधिकारी,,फॉरेस्ट अधिकारी राजेश गणेशराव गायकी सर, घंटाग गावातील वनरक्षक सुमुरति मावसकर, वनरक्षक शांती बेटेकर, यांनी मोलाचे सहकार्य केले.पी,पी, बाविस्कर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सहकार्य केले. तेथील स्थानिक लोकांनी सहकार्य केले. कारंजा गाडी डायव्हर गणेश चव्हाण यांनी खूप मदत केली.
मेळघाटातील सामाजिक उपक्रम अतिशय दुर्गम भागात असून सुद्धा व्यवस्थित पार पडला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here