आम आदमी पार्टी तर्फे शेकडो कार्यकर्त्या सोबत महपरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
93

शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

आम आदमी पार्टी, नागपूर तर्फे 67 वा महपरिनिर्वाण दीना निमित्त संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. त्यांचा विचार जनसामान्य लोकांपर्यंत पक्षा मार्फत नेईल ही शपथ पदाधिकारी यांनी घेतली. हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्री भूषण ढाकुळकर, शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे यांचे नेतृत्वाखाली संपन्न झाला. ह्या कार्यक्रमात प्रामुख्याने वरिष्ठ नेते डॉ. शाहिद अली जाफरी, महासचिव नागपूर डॉ. अमेन नारनवरे, संघटनमंत्री रोशन डोंगरे, उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण शैलेश गजभिये, उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण संजय बोरकर, उपाध्यक्ष नागपूर शहर विपिन कुर्वे, महिला उपाध्यक्ष अलका पोपटकर, करण शाहू उपस्थित होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ध्येय धोरणे विचार तसेच दिल्ली आणि पंजाब मधील बाबासाहेबांच्या विचारधारेनुसार जनहिताची केलेल्या कामांची माहिती शहरांच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील व जिल्ह्यात लोकांच्या समस्या सोडवण्याचे काटेकोट प्रयत्न करतील. भ्रष्टाचार विरोधात पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतील हा विचार ठेवून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सचिन वाघाडे, शिरीश काका तिडके, बालूभाई पटेल, संदिप कोवे, स्वप्निल सोमकुवर, शुभम पराले, चंद्रशेखर पराल, संदीप कोवे, चैताली रामटेके, अर्चना राळे, नीलिमा नारनवरे, पिंकी बारापात्रे, अमन मेश्राम, प्रजय रामटेके, अनिल राहुलकर, प्रणित डोंगरे व शेकडो नगरीकाच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here