
सेवा सहकारी संस्था गुंजेवाहीचा उपक्रम
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सहकारी संस्था गुंजेवाहीचे अध्यक्ष संजय पुपरेड्डीवार यांनी संस्थेच्या नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांना सपत्नीक ब्लॅंकेट व अन्य भेट वस्तू देत सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा केला.
आयोजित कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गुंजेवाही सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय पुपरेड्डीवार, अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सभापती चंद्रशेखरजी चन्ने, माजी जि. प. सदस्य रूपाताई सूरपाम, गुंजेवाही सरपंच वसंत टेकाम, ग्रा. प.सदस्य सादिक शेख, सिंदेवाही – लोनवाही न. प. नगरसेवक वैशाली पूपरेड्डीवार, टेकाम मॅडम तथा सेवा सहकारी संस्था गुंजेवाहीचे सर्व सदस्य गण व काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

सेवा सहकारी संस्था गुंजेवाही ही शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली संस्था असून सदर संस्थेला बराच काळ लोटला आहे. मागील संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष संजय पूपरेड्डीवार यांनी संस्था डबघाईला येऊ नये तसेच संस्थेमार्फत कर्जाची उचलणाऱ्यांनी नियमित परतफेड करावी या उद्द्यांत हेतूने तद्वतच संपूर्ण ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात विकासाच्या झंजावातातून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत सेवा सहकारी संस्थे गुंजेवाहीच्या नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या 234 सभासदांना ब्लॅंकेट व अन्य भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदर संस्थेचा हा पहिला सामाजिक उपक्रम असून गुंजेवाही परिसरातील संस्थेच्या सभासदांना संस्थेमार्फत कर्जासह मानसन्मान मिळावा याकरिता सदर सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचा मानस यावेळी सेवा सहकारी संस्था गुंजेवाही अध्यक्ष संजय पूपरेड्डीवार यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी सभासद व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शेकडांच्या संख्येने उपस्थित होते.














