prabodhini news logo
Home चंद्रपूर सिंदेवाही येथे भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आणि रक्तदान शिबिर संपन्न

सिंदेवाही येथे भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आणि रक्तदान शिबिर संपन्न

0
276

तालुका कांग्रेस कमिटी सिंदेवाहीच्या वतीने आ. ना. विजय वडेट्टीवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि,
सिंदेवाही

विधानसभचे विरोधी पक्षनेते, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने तालुका काँगेस कमिटीच्या वतीने भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन सिंदेवाही येथे करण्यात आले.सेवाग्राम मेडिकल सेवाग्राम, लायन्स क्लब चंद्रपूर कृषी – उत्पन्न बाजार समिती सिंदेवाही तथा तालुका काँग्रेस कमेटी, सिंदेवाही यांच्या वतीने काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमाकांत लोधे व तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोतिबिंदू तपासणी शिबिरात ५२० नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात येऊन २३३ रुग्णांची शस्त्रक्रियेकरिता निवड करण्यात आली.

६० रुग्णांना शस्त्रक्रियेकरिता रवाना करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराला 23 रक्तदात्यनी रक्दान करून आपले दायित्व निभावले. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पानमंद, पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण,रमाकांत लोधे सभापती बाजार समिति सिंदेवाही, महिला तालुका अध्यक्ष सीमा सहारे, शहर अध्यक्ष सुनील उट्टलवार, शहर महिला अध्यक्ष प्रीती सागरे, नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, उपाध्यक्ष मयूर सूचक, बांधकाम सभापती पंकज नन्नेवार, पाणीपुरवठा सभापती भास्कर नन्नावार, महिला बालकल्याण सभापती मीनाक्षी मेश्राम, उपसभापती पूजा रामटेके माजी नगराध्यक्ष आशा गंडाते, शहर युवक अध्यक्ष अभिजित मुप्पीडवार नगरसेवक दिलीप रामटेके, श्याम छत्रवानी, अमृत मडावी, नीताताई रणदिवे, जयश्री कावळे, पुष्पा सिडाम, संगीता शंखपाल, निमंत्रीता कोकोडे उपस्थित होते. संचालन नगरसेवक युनूस शेख यांनी केले तर प्रस्ताविक मंगेश मेश्राम आणि आभार अक्षय पेटकुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोरेश्वर ज्ञानवाडकर, अशोक सहारे, कांग्रेसचे पदाधिकारी ,नगरसेवक ,कार्यकर्त यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here