
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि,
सिंदेवाही
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव निमित्त जोशाबा युवा संघटना व सावता माळी समाजच्या वतीने जिल्हास्तरीय एकल व समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमस्थळी उद्घाटक मा. जयश्री कावळे संचालक कृषी उत्पन बाजार समिती व अध्यक्ष म्हणून रमाकांतभाऊ लोधे माजी जिल्हा परिषद सदस्य उपास्थित होते. स्पर्धेमध्ये एकूण 26 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये समुह नृत्याचे प्रथम पारितोषिक 15 हजार रुपये ‘जय भवानी ग्रुप तळोधी’, द्वितीय पारितोषिक 10 हजार रुपये ‘इलेक्ट्रॉन्स ग्रुप चंद्रपूर’ व तृतीय पारितोषिक 7 हजार रुपये ‘महाराष्ट्र ग्रुप सिंदेवाही’ ला मिळाले, तसेच एकल नृत्याचे प्रथम पारितोषिक 7 हजार रुपये सुगित उराडे, द्वितीय पारितोषिक 5 हजार रुपये यश कावडे व तृतीय पारितोषिक 3 हजार रुपये डेनी राऊत असे बक्षिस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौरभ गुरु , आशुतोष बुद्धरपवार व स्नेहल कोलतरवार उपस्थित होते. संचालन अविनाश गुरनुले यांनी केले. जोशाबा युवा संघटना मिनघरी च्या वतीने सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.














