prabodhini news logo
Home ठळक बातम्या पुणे पालिकेचा मनमानी कारभार सुरूच

पुणे पालिकेचा मनमानी कारभार सुरूच

0
199

पुणे प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

पालिकेत नगरसेवक असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना खर्चासाठी परवानगी घ्यावी लागत होती.मात्र पालिकेचा नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे राज्य सरकारकडून पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की अनेक महिन्यापासून प्रशांत कांबळे हे मोहेला कमिटीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न मांडत आहे. सच्चाई माता परिसर अटल 12 आंबेगाव खुर्द येथे पथदिवेच नाहीत. त्या भागामध्ये पथदिवे लावण्यात यावे या संदर्भात वारंवार तक्रार देऊन देखील अध्याप पालिकेने तिथं कुठेही लाईट पोल लावण्यात आलेला नाही. जिथे खरंच गरज आहे तिथे पालिका सुविधा देत नाही. नाही तिथं पालिका नागरिकांच्या पैशावरती दरोडा टाकताना दिसत आहे. मागील वर्षी फेब्रुवारी 2022 भारती विद्यापीठ येथील चांगले पोल असताना देखील बदलण्यात आले होते. त्याची बातमी न्यूज पत्रामध्ये सुद्धा आली होती. पुन्हा एकदा ह्याच महिन्यामध्ये बरोबर एक वर्ष झाला आत्तासुद्धा तेच पोर मागील वर्षी बदलून देखील आता पुन्हा 22 पोल नव्याने बदली करत आहे. पालिकेचा भोंगळ कारभार भ्रष्टाचार हा चव्हाट्यावर त्याला आहे. पण ह्याकडे कोणाचाही लक्ष नाही. मुख्यमंत्री सध्या कबड्डी खेळण्यात गुंग आहे. त्यामुळे इथे गुन्हेगारी डोकं वर काढत आहे. देशाला 76 वर्ष स्वातंत्र्य मिळून देखील लोकांना अजून सुख सुविधा मिळालेल्या नाहीत. पालिकेमध्ये 2017 मध्ये हा भाग गेला असला तरी सुद्धा या भागामध्ये लाईट, पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन, सी सी टीव्ही कॅमेरे अस्तित्वात नाही. नागरिकांना सुविधा मिळणार कधी व भ्रष्टाचार थांबणार कधी असा संतप्त सवाल नागरिक करत आहे. असे प्रशांत कांबळे आमच्याशी बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here