prabodhini news logo
Home घुग्घुस भारतीय बौद्ध महासभा घुग्घुस “चलो बुध्द की और’ मोहीम सुरू

भारतीय बौद्ध महासभा घुग्घुस “चलो बुध्द की और’ मोहीम सुरू

0
108

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

घुग्घुस – आज दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचे औचित्य साधून घुग्घुस येथे पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस, यशोधरा महिला मंडळ घुग्घुस चा अनुषंगाने “चलो बुध्द की और’ पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे मोहिम सुरू करण्यात आली.
आठवड्यात एक दिवस दर रविवार ला दुपारी दोन वाजता आपण आपल्या परिवारासोबत विहार मध्ये दोन तास समाजासाठी द्यावा या चलो बुध्द की और मोहीम मध्ये आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म, मेडीटेशन, शिक्षण विषय, जनरल नॉलेज, या विषय सर्वांना मार्गदर्शन केले जाणार आहे. अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी या मोहिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन केले.
विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, उपाध्यक्ष शरद पाईकराव, केंद्रीय शिक्षिका मायाताई सांड्रावार, यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन यशोधरा महिला मंडळ उपाध्यक्षा प्रतिमा कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आयुनी. कुमुदताई निखाडे यांनी यावेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, मनोहर नगराळे, विजय कवाडे, यशोधरा मस्के, सुषमाताई धोटे, रामटेके, भालचंद्र जिवणे, किरणताई गोंगले, विद्या दुबे, सखुबाई देशकर, देशकर ताई, सोनटक्के, वाघमारे, पारिखा कांबळे, रिया कांबळे, कांबळे आई, नगभोगा ताई व समस्त बौद्ध बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here