सुभाष दरेकर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, अहमदनगर
9858322466
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे आज दि 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडगाव व नूतन माध्यमिक विद्यालय हिरडगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना स्व. दत्तात्रय धोंडीबा शिंदे गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गावातील विमल दत्तात्रय शिंदे यांनी स्वकष्टातून जमवलेल्या पैशातून 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेस रू. 75 हजार देणगी दिली.
ही रक्कम कायम ठेव म्हणून ठेवण्यात आली. त्यातून दरवर्षी येणाऱ्या व्याजाच्या रकमेतून इयत्ता पहिली ते सातवी या जिल्हा परिषद शाळेतील व इयत्ता आठवी ते दहावी माध्यमिक विद्यालयातील प्रत्येक वर्गातून प्रथम येणाऱ्या / विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम गुणवत्ता शिष्यवृत्ती म्हणून प्रदान करण्यात येते. यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागून त्यांची गुणवत्ता वाढ होत असल्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे.
सदर शिष्यवृत्तीचे हे दुसरे वर्ष आहे.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिंदे कुटुंबातील व्यक्ती च्या हस्ते तसेच हिरडगाव सोसायटीचे चेअरमन झुंबरराव दरेकर विद्यमान सरपंच दिपाली दरेकर मा सरपंच सुनिताताई दरेकर उपसरपंच चिमाजी दरेकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र शिंदे मुख्याध्यापक खोसे सर माध्यमिक चे मुख्याध्यापक तांबे सर काष्टी सेवा सोसायटी मा मॅनेजर बाळासाहेब दरेकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

