
दि. २१ जून २०२५ रोजी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यलयामधे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच पतंजली योग सेवा समिती, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिवस निमित्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एजाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पतंजली योग सेवा समिती, चंद्रपूरच्या वतीने देविदासजी ठावरी, श्रीकान्त बावणे, मंजूषा तपासे, शामराव हरडे यांनी याप्रसंगी विविध योग साधनांचे प्रात्यक्षिक सादर केले. ठावरी यांनी प्रत्येक योगासन, त्याचे महत्व आणि ती साधना करावयाचा कालावधी याची विस्तृत माहिती उपस्थितांना सांगितली. योग साधना करून आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेऊ शकतो असे बावणे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एन.एस.एस. प्रमुख नंदकिशोर भंडारी आणि माजी एन.एस.एस. प्रमुख डॉ. सरोजुमार दत्ता यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थीची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. एजाज शेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला योग साधना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून अंगीकरायचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. लीना लंगडे तसेच आभार प्रदर्शन डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी केले.















