prabodhini news logo
Home चंद्रपूर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुण प्रदर्शनाचे माध्यम – डॉ. सतिश वारजुकर

सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुण प्रदर्शनाचे माध्यम – डॉ. सतिश वारजुकर

0
72

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

आज ब्रम्हपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरगांव (बुज )येथे गणराज्य दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा सतिशभाऊ वारजुकर होते विशेष अतिथी म्हणून माजी उपसभाती पं.स. ब्रम्हपुरी विलासजी उरकुडे, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष संजय कोसरे, केंद्र प्रमुख मुरलीधरजी खोब्रागडे, पोलीस पाटील सोमेश्वरजी राऊत, कांग्रेस कार्यकर्ते भूपेश कोरे, तंटामुक्ती अध्यक्ष किशोरजी नखाते, ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र रामटेके, जयपालजी तुपटे, हर्षदजी चांदेकर, श्रावणजी राऊत, डॉ. सहारे साहेब,राऊत सर,बोईनवार मॅडम, मनोहरजी मेश्राम व विद्यार्थी,ग्रामवासी उपस्थित होते
विद्यार्थी जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण जोपासण्याचे आणि वाढविण्याचे केंद्र म्हणजे शाळा व सांस्कृतिक कार्यक्रम होय. शालेय वयातच विद्यार्थी आपली वेगवेगळी कला जोपासत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमात आज सहभागी विद्यार्थी सांस्कृतिक कलेचा वारसा जपणे आणि स्वतःची कला विकसित करण्याचे काम करणार आहेत. अभ्यासापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी विविध कौशल्यांचा विकास करणे आवश्यक आहे.असे आपल्या अध्यक्षीय भासनातून डॉ. सतिश वारजूकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रास्तावना मुख्याध्यापक गंगाधरजी मडावी,सूत्रसंचालन तुपट सर तर आभार ग्रामपंचायत सरपंच संजयजी राऊत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here