prabodhini news logo
Home घुग्घुस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर विरोधात आंदोलन

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर विरोधात आंदोलन

0
138

सुरेश मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झेंडा कामगार संघटना

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

घुग्घुस – आज दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी सफेद झेंडा कामगार संघटनेचा माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाचा माध्यमातून मागणी करण्यात आली कि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर दिनांक 6 नोव्हेंबर 2023, दिनांक 5 जानेवारी 2024, दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी निवेदन, स्मरण पत्र, व वारंवार विनंती करुण सुध्दा MPCB कार्यालय चंद्रपूर यांनी लायडस मेटल घुग्घुस कंपनीवरती कसलीही कुठलेही कारवाई केली नाही. किंवा त्या बाबत आम्हाला सुचवणार असे सांगुन सुध्दा अद्याप आम्हाला सुचविले नाही.

लायडस मेटल कंपनी हे प्रदुषणामध्ये लोह्याचे कण बाहेर सोडते अशा कंपनीवर सक्त कारवाई करण्यात यावी. या प्रदुषणामुळे घुग्घुस शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आहे या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई करुन कंपनीला घुग्घुस शहराचा दहा किलोमीटर दुर बाहेर करण्यात यावे अशी मागणी केली असता. अद्याप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर अधिकार्‍यांनी कंपनीवर कारवाई करण्यात केली नाही.

म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर अधिकार्‍यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी नाईलाजाने आम्हाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर चा विरोधात तीव्र आंदोलन दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात येत आहे.
या आंदोलनामध्ये जे काही नुकसान व भरपाई चे जिम्मेदार लायडस मेटल एनर्जी प्रा. लि. कंपनी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर शासन प्रशासन राहतील असा देखील इशारा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here