
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील एका घरातील स्वंयपाक घरात कोब्रा नाग आपल्या भक्ष्याच्या मागोमाग शिरला होता. घरातील उंदीर नागाने गिळकृत करुन सुस्त पडला होता. माञ घरातील त्या विषारी कोब्रा नागाला पाहूण घरातील कुंटुंबाची चांगलीच झोप उडाली होती.
येरोळ येथील महिला शोभाताई ओमप्रकाश तांबोळकर या सांयकाळचा स्वंयपाक करण्यासाठी घरात गेल्या असता भल्ला मोठा कोब्रा नाग हा उंदीर गिळकॄंत करुन सुस्त पडला होता. या नागाला पाहुन घरातील कुंठुंबाची भीतीने चांगली झोपच उडाली. गेल्या पाच सहा दिवसापासुन वातावरणात बदल झाल्याने साप आपल्या बिळातुन विषारी बिन विषारी साप भक्ष शोधण्यासाठी मानवी वस्तीच्या ठिकाणी धाव घेत आहेत. साप निघाल्याची माहीती सुमठाणा येथील सर्पमिञ तरुण सुदर्शन लांडगे यांना फोनवर देताच त्यांनी या सापाला पकडुन वनविभागा मार्फत वनामध्ये सोडुन दिले. घरात कुठेही साप निघाल्यास सर्पमिञ सुदर्शन लांडगे यांना माहीती द्यावी असे आवाहान करण्यात आले.














