पार्थशर समाचार च्या तिसऱ्या वर्धापन दिनी ९ फेब्रुवारीला पुरस्कार प्रदान
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
सामाजिक जाणीव असणारा जुनोना गावातील प्रेम नामदेव जरपोतवार यांना चंद्रपूर रत्न पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
प्रेम जरपोतवार याने जुनोना गावात अभ्यास वर्ग शाळे नंतरची शाळा उपक्रम सुरु करून विद्यार्थांना शिक्षणाचे धडे दिले, कोरोणा काळात जनजागृती, अभ्यासवर्गात विविध उपक्रम,महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम, ग्रामस्वछता, शासनाच्या विविध योजनाची जनजागृती, वृक्षारोपण, गावोगावी प्रबोधन कार्यक्रमातून जनसामान्यापर्यंत महापुरुषांचे विचार रुजवण्यासाठी करीत असेलेले कार्य, महिला साक्ष्मीकरणं, आरोग्य शिबीर, रक्तदान, तसेच विविध नामांकित संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हूणन सामाजिक कार्य केले. प्रेमला त्याचा सामाजिक कार्यासाठी शिक्षणप्रेमी पुरस्कार, आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार , महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणार मिस्टर एस. आर. एम पुरस्कार मिळाला आहे. प्रेमने २०२३ च्या राज्यस्तरीय युवा संसद मध्ये मुंबई येथे चंद्रपूर जिल्ह्याचे आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली चे नेतृत्व केले होते.सामाजिक कार्यात व विविध संस्थेत तो सक्रिय आहे.
सामाजिक कार्याची दखल घेऊन विदर्भातील प्रसिद्ध पार्थशर समाचारच्या वतीने २०२४ या वर्षीचा चंद्रपूर रत्न हा पुरस्कार प्रेम जरपोतवार यांना जाहीर जाहिर करण्यात आला आहे. प्रेमने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, बहीण, भाऊ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री कापसे, प्रा. डॉ किरणकुमार मनुरे तसेच सर्व प्राध्यापकवृंद,गावकरी मित्रपरिवार, प्रशिक शेंडे, सुरज चापले यांना दिले.

