prabodhini news logo
Home क्राईम तुमसर शहरांमध्ये सहा दुकानकान फोडून केली चोरी

तुमसर शहरांमध्ये सहा दुकानकान फोडून केली चोरी

0
269

डॉ. सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर शहराच्या मध्यभागी बोस नगर मधील किराणा ओलीत चोरांनी सहा दुकाने चे शटल वाकवून चोरी केली .ही दुकाने सर्व आजूबाजूलाच आहे .ही घटना 21 .6 .2025 चा रात्री ची आहे .ही घटना सकाळी उघडीस आली .त्यामुळे शहरांमध्ये फार बोंबाबोंब आणि भयावक स्थिती निर्माण झाली आहे .लगेच तुमसर पोलीस स्टेशनला घटना विषयी सूचना देण्यात आले .या घटनेमध्ये गौरीशंकर निखाडे चे परमात्मा एक सेवक किराणा स्टोअर यांच्या दुकानातून चोरट्यांनी तीन लाख 51 हजार पाचशे रुपये व 12 हजार रुपयाचे सोने व चांदीचे सिक्के असा एकूण तीन लाख 66 हजार पाचशे रुपये च्या मुद्देमाल चोरांनी लंपास केला. दुसरा रमेश सोनवणे ची किराणा दुकानातून काजूचे बरणी नेले .बाकीचे राजेश मेश्राम ,रोशन लांजेवार, चंद्रकांत हटवार, दामू सोनवणे यांच्या दुकानातून चिल्लर रूपये घेऊन गेले .फक्त सर्वात जास्त नुकसान गौरीशंकर निखाडे दुकानदार यांचे झाले .तुमसर मध्यभागी असलेले घटनास्थळ तुमसर पोलीस स्टेशनच्या अवघ्या १०० मीटरवर अंतरावर आहे. चंद्रकांत हटवार किराणा स्टोअर च्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागले होते. काही चोरट्याची हालचाली तिथे कैद झालेली आहे .नंतर चोरांना लक्षात येताच सीसीटीव्ही कॅमेरा त्यांनी फोडला . चोरटे हे रेनकोट मध्ये होते. असे दिसून आले.पोलीस अधिकारी नी पोलिस डॉग ची व्यवस्था करून संपूर्ण एरियाची तपासणी करण्यात आली .काही गोष्टी गोपनीय ठेवण्यात आले .जिल्हा भंडाराचे पोलीस अधीक्षक नूरल हुसेन चे मार्गदर्शनामध्ये पुढील तपासणी सुरू आहे .तुमसर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय गायकवाड हे फार मेहनतीने आणि चिकाटीने या घटनेसाठी तपासात लागलेले आहेत .पुढची तपासणी जोरदार सुरू आहे. सर्वांना विश्वासात घेऊन चोरांना पकडण्यासाठी तुमसर पोलीस स्टेशन चे अधीकारी फार धावपळ करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here