
रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपुरी- अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या सौजन्याने दिनांक 27 जानेवारी 2024 ला गौरव नगरी, देसाईगंज रोड ब्रम्हपुरी येथे संपन्न झालेल्या कुणबी समाज उपवर वधू परिचय मेळावा प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी पुरस्कार तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
त्यानिमित्य अखिल कुणबी समाजाच्या वतीने ऋणानुबंध जोड नात्याची या स्मरणिकेचे विमोचन समारंभ कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले.
अखिल कुणबी समाजातील उपवर वधू यांची माहिती असलेली ‘ऋणानुबंध जोड नात्याची’ या स्मरणिकेचे विमोचन कार्यक्रम राजस्थानी सभागृह ब्रह्मपुरी येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाला याप्रसंगी कार्यक्रमालाअध्यक्ष ज्येष्ठ नेते जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेची संचालक दामोधर मिसार होते तर उद्घाटक म्हणून ब्रह्मपुरी च्या कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीमती उषाताई चौधरी व कॅनरा बँकेचे व्यवस्थापक मा.अंकुशजी मशाखेत्री साहेब होते. याप्रसंगी विचारपिठावर मंडळाचे अध्यक्ष ऋषीजी राऊत ,ॲड.गोविंद भेंडारकर साहेब ,प्रा.प्रकाशजी बगमारे, प्रमोद चिमूरकर, प्राचार्य, जगनाडे, नानाजी तुपट, प्रा.डॉ.राकेश तलमले, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विष्णुजी तिवाडे, योगीराज कुथे,वासुदेव सोंदरकर,प्रकाशजी धोटे,नोगेश बगमारे, बाजीराव भुते, प्रेमलालजी धोटे, फाल्गुनजी राऊत, सुरेश दर्वे,विनोद नवघडे, इ.मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी कुणबी समाजाचे नेते प्रा.प्रकाशजी बगमारे साहेब यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा सत्कार अखिल कुणबी समाज मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा देवून अभिष्टचिंतन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.प्रकाशजी बगमारे यांनी आपले परखड मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष पिलारे यांनी केले व प्रास्ताविक स्मरणिकेचे प्रमुख पत्रकार राहुल भोयर व राहुल मैंद यांनी तर उपस्थितांचे आभार विलास दुपारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मामाजी वझाडे, विलास दुपारे, संतोष पिलारे,नितीन चिंतामणे,विजय बगमारे, राहुल मैंद, नारायणराव मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले.














