
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
शोभा वेले नागपूर यांना आंतरराष्ट्रीय आदर्श समाजसेविका पुरस्कार नेपाळ काठमांडू येथे दिनांक १४/२/२०२४ला प्रा.डाॅ.संघर्ष सावळे यांच्या हस्ते देण्यात आला.आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा, पुस्तक प्रकाशन आणि बहारदार कविसंमेलन व संत सेवालाल महाराज जयंती उत्सव सोहळा हर्ष उल्हासात दिनांक :१४/२/२०२४ रोजी साजरा, करण्यात आला .
बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद च्या वतीने हा कार्यक्रम हाॅटेल हाॅलीडे रेजींसी रारा कान्फरन्स हाॅल थामेल काठमांडू, नेपाळ येथे घेण्यात आला.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा.डाॅ.संघर्ष बळीराम सावळे, स्टुडंट्स ॲम्बेसेडर ऑफ स्कॉटलंड हे होते.
मा.शोभा वेले यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय आदर्श समाजसेविका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या दैदिप्यमान सोहळ्याला अध्यक्ष मा.डॉ.प्रा.अशोक पवार अर्थशास्त्र विभाग औरंगाबाद, प्रमुख पाहुणे म्हणून मा.माजी न्यायमूर्ती नामदेवजी चव्हाण पुणे,मा.राजाराम जाधव,मा.विजयकुमार कस्तुरे, चिखली बुलढाणा,मा.शोभा वेले, नागपूर जेष्ठ कवयित्री, समाजसेविका.मा.डाॅ.प्रा.संघर्ष बळिराम सावळे, स्टुडंट्स ॲम्बेसेडर ऑफ स्कॉटलंड,मा.बबन महामुनी,मा.खरात सर प्रामुख्याने उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.शेळके सरआणि सोनल मॅडम यांनी केले.आभारप्रदर्शन मा.आशा पारधे यांनी केले.कार्यक्रमाला चाळीस मान्यवर उपस्थित होते.
नेपाळचा प्रवास आल्हाददायक आणि स्मरणात राहील असाच होता.
कार्यक्रमाला.बुलडाना,शेगाव, मलकापूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील मान्यवर उपस्थित होते
अश्विनी मॅडम,सोनल मॅडम यांचे महत्वाचे योगदान कार्यक्रमाला लाभले.
विजय कुमार कस्तुरे सरांची चल सखे ही कविता प्रेक्षकांची दाद मिळवून गेली.महामुनी सरांची कथा सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवून गेली.
एकूणच बहारदार असा दैदिप्यमान सोहळा नेपाळ, काठमांडू येथे पार पडला














