
आमचा गाव आमचा विकास समितीचे आयोजन
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील आमचा गाव आमचा विकास समिती यांच्या वतीने १० मार्च २०२४ ला भव्य खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. सकाळी ७ वाजता सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय मिनघरी येथून स्पर्धेची सुरुवात होणार आहे.
पुरुष गटामध्ये हि स्पर्धा १० किमी असणार आहे यामध्ये प्रथम पारितोषिक ७००० रू., द्वितीय पारितोषिक ५००० रू, तृतीय पारितोषिक २००० रू, चतुर्थ पारितोषिक १००० रू, पाचवे पारितोषिक ५०० रू आहे. तर महिला गटात हि स्पर्धा ५ किमी ची असणार आहे.
यामध्ये प्रथम पारितोषिक ५००० रू , द्वितीय पारितोषिक ३००० रू, तृतीय पारितोषिक २००० रू, चतुर्थ पारितोषिक १००० रू. पाचवे पारितोषिक ५०० रू विजेत्या स्पर्धकांना शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.














