prabodhini news logo
Home चंद्रपूर 13 मार्च रोजी आयटीआयमधील ’त्या’ साहित्याचा लिलाव

13 मार्च रोजी आयटीआयमधील ’त्या’ साहित्याचा लिलाव

0
91

प्रणित तोडे
व्यवस्थापक संपादक,
चंद्रपुर

चंद्रपूर, दि. 5 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागभीड, येथील व्यवसायातील निरुपयोगी कालबाहय झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य उपकरणांची आहे त्याच अवस्थेत विक्री करण्यात येत आहे. या करिता 28फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यांत आला होता. परंतु शासकीय किंमतीवर बोली न झाल्याने आता 13 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यांत आला आहे.
इच्छुक निर्लेखित साहित्य खरेददारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एम. आय. डी. सी. परिसर, नागभीड येथे अधिकृत लक्ष्यासह लिलाव प्रकियेत उपस्थित राहावे, असे शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.एम. डांगे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here