
पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही
गडचिरोली प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
गडचिरोली दि. 20 : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. आज चार व्यक्तींनी एकूण 14 नामनिर्देशन अर्ज नेले. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 27 मार्च 2024 आहे.














