prabodhini news logo
Home चंद्रपूर गुरूशिष्याच्या जयंतीला रक्तदान, रोगनिदान शिबिर आयोजित करून केले अभिवादन

गुरूशिष्याच्या जयंतीला रक्तदान, रोगनिदान शिबिर आयोजित करून केले अभिवादन

0
150

डॉ. नंदू खोब्रागडे यांनी स्वतःच्या जन्मगावी येऊन केले रक्तदान.

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

नागभीड़ तालुक्यातील गिरगांव येथील समाजसेवक श्री. कुंदन सतीश खोब्रागडे यांच्या संकल्पनेतुन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त क्रिया फाऊंडेशन गिरगांव तालुका. नागभीड़ जि. चंद्रपूर द्वारा आयोजित भव्य रक्तदान रोगनिदान आणि मोफत औषधोपचार शिबिरामध्ये शंभराहून अधिक ग्रामवासियांनी बी.पी., शुगर आणि रक्ताच्या विविध चाचण्या करीत लाभ घेतला. आवश्यक असलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच 20 ते 25 स्वयंसेवकांनी स्वेच्छेने रक्तदान करीत तरुणांपुढे समाजसेवेचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला. या रक्तदान शिबिरामध्ये डॉ. नंदू खोब्रागडे हे ब्रम्हपुरी येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करीत वास्तव्यास असतात, त्यांना शिबिराची माहिती मिळताच त्यांनी आपल्या स्वगावी येऊन रक्तदान केले. वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असल्याने रक्ताची कमतरता जेव्हा भासते, तेव्हा रुग्णाला आणि रुग्णाच्या नातेवाईकांना काय त्रास होतो, याची जाणीव त्यांना आहे, म्हणून त्यांनी हे समाजकार्याचे पाऊल उचलून तरुणांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.
या शिबिराची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली. या शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरची रक्तपेढी बोलविली होती. या कार्यक्रमाला उद्घाटक डॉ. प्रतिक गेडाम चंद्रपूर, डॉ. नकुल बाढे चंद्रपूर, अध्यक्ष म्हणून डॉ. दीपक भामरे CHO प्रा. आ. केंद्र गिरगांव, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अमोल जिद्देवार, विकासजी गोंडाने, सदस्य ग्रा. पं. गिरगांव, राकेश खोब्रागडे माजी सदस्य ग्रा. पं. गिरगांव, अमोल रामटेके, डॉ. अतिशय कांबळे आरोग्यसेवक, अभिलाष कुकडे, सुखदेव चांदेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन शाखा गिरगांव चे अध्यक्ष श्री. चंदन खोब्रागडे, क्रिया फाउंडेशनचे सहसचिव आशिक सतीश खोब्रागडे, उपाध्यक्ष प्रमोद डोंगरे, सदस्य चंद्रशेखर बारसागडे, वासुदेव सोनवाणे, साहिल खोब्रागडे,राजेंद्र बोरकर, सागर खोब्रागडे, विनोद रामटेके, हरिश्चंद्र खोब्रागडे, गुंफा खोब्रागडे महिला कार्याध्यक्षा, सुरेखा खोब्रागडे, विद्या खोब्रागडे, साधना खोब्रागडे, प्रज्ञा खोब्रागडे, सपना खोब्रागडे, सुकेषणी बारसागडे, मनी बन्सोड, व इतर सभासदांनी परिश्रम घेतले.
या शिबिराला डॉ. नाना के. मेश्राम ब्रम्हपुरी, डॉ. नंदु खोब्रागडे ब्रम्हपुरी, डॉ. धनंजय ठीकरे, डॉ. विद्याधर राऊत ब्रम्हपुरी, डॉ. जीवन तलमले मिंथुर, डॉ. सोमेश्वर सहारे तळोधी, यांनी कार्यक्रमस्थळी सदिच्छाभेट दिली. सर्वतोपरी पोषक अश्या कार्यक्रमाचे आयोजन गावामध्ये केल्याने क्रिया फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष कुंदन सतीश खोब्रागडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here