prabodhini news logo
Home चंद्रपूर आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटने तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटने तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

0
255

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथील आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्रामसभाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. रत्नापुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास माल्याअर्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अतुल बारेकर व संघटक गोपाल गायकवाड यांनी बाबासाहेब यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे माल्या अर्पण व दीप प्रज्वलन केले. त्यानंतर विद्यार्थी युवा संघटनचे सल्लागार वासुदेव दडमल यांनी थोडक्यात असं मार्गदर्शन केलं.

कार्यक्रमाचे संचालन प्रशांत दडमल यांनी केले. याप्रसंगी सांस्कृतिक प्रमुख सचिन ढोणे, प्रसिद्ध प्रमुख अनिकेत वाकडे, सह सांस्कृतिक प्रमुख गायत्री चौके ,सल्लागार हरीश गायकवाड, मयुरी दडमल तसेच विद्यार्थी व संघटनेचे सल्लागार तथा सिंदेवाही तालुका समतादूत कृपाली धारणे उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here