
निवडणुका झाल्याम्हणून जनतेला विसरू नका, आप चे राजू कुडे यांचे लोकप्रतिनिधीना खडे बोल
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर : चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली यांच्या यात्रेमध्ये मराठवाडा भागातून मोठ्या संख्येत येणाऱ्या यात्रेकरूंचा सोयी सुविधेमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा न झाल्यामुळे आज अचानक झालेल्या तुफानी बरसातीने प्रशासनाच्या व्यवस्थेचे पोल खुल्याचे चित्र दिसले. अनेक ठिकाणी यात्रेकरूंना शौचालयाची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, राहण्याची, स्वयंपाक करण्याची व्यवस्था कुठेही नसल्याने यात्रेकरूंच्या समोर खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले पाहायला मिळाले.

या जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असून मोठ्या प्रमाणात सी एस आर फंड मिळतो तथा येथील राजकीय भौगोलिक स्थिती बघता अनेकदा या जिल्ह्यातील नेत्यांनी मंत्रीपद भूषवलेले आहेत तरी देखील सुधारणा होत नसल्याने चंद्रपूरच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधारी आणि विपक्ष कामाच्या बाता मारत फिरत होते. मात्र आता जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र जिल्हात दिसत आहे. त्यामुळे सर्वसाधारण आम आदमी स्वतः ची फसवणूक झाल्यासारखा वाटून घेत असून तात्काळ यात्रेकरूंची सोय करण्याकरिता उपाय योजना करव्यात अन्यथा आम आदमी पार्टी प्रशासनाचा विरोधात रस्त्यावर उतरेल असे आम आदमी पार्टी चे युवा जिल्हाद्यक्ष राजू कुडे यांनी म्हटले आहे.














