prabodhini news logo
Home चंद्रपूर पारंपारिक संस्कृतीला जोपासत चक्क बैलगाडीवर नववधूच्या गावी वरात….

पारंपारिक संस्कृतीला जोपासत चक्क बैलगाडीवर नववधूच्या गावी वरात….

0
271

सिंदेवाही तालुक्यातील या विवाह सोहळाची चर्चा….

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

आधुनिक तंत्रज्ञानाच्या धकाधकीच्या काळात पारंपारिक संस्कृती ला जोपासत चक्क बैलगाडीवर नववधूच्या गावी वरात नेऊन दिखाऊपणाच्या काळात समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील कुकडहेटी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चारगाव येथील संकेत काशीनाथ चौधरी याचा विवाह तालुक्यातील पेटगाव येथील योगेश्वरी अशोक शेंडे यांच्या मुलीसोबत शनिवारी वधुमंडपी पेटगाव येथे होता.
या आधुनिक काळात वरात नेणे म्हणजे मोठ मोठ्या ट्रॅव्हल्स तसेच चारचाकी वाहने वाहनाची नुसती रेलचेल असते. नुसती पैशाची उधळपट्टी केली जाते. पंरतु याही काळात जुन्या पारंपारिक संस्कृतीला जपत आपल्या नंदीबैलाला व बैलगाडी ला आकर्षक सजवून धजवून स्वगावाहुन मोठ्या दिमाखात वरात नववधूच्या गावी निघाली.
एकीकडे लग्न म्हणजे नुसती पैशाची उधळपट्टी केली जात आहे तर दुसरीकडे समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा अशी वरात जाते तेव्हा आपण आधुनिक काळात पारंपारिक संस्कृती जप्त असल्याचे कोठेतरी मनाला समाधान मिळते.
सिंदेवाही तालुक्यातील चारगाव ते पेटगाव हे सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर चक्क बैलगाडीला सुशोभित व सुंदर सजावट करून मोठ्या दिमाखात वरात निघाल्याने सगळ्यांच्या नजरा नवरदेवाच्या बैलगाडीवर जात होत्या. चक्क बैलगाडीवर आलेल्या वरात पाहुन मात्र सगळ्या आश्चर्य चा धक्का दिला होता हे विशेष.
ह्या वरतीचे साक्षीदार होण्यासाठी सर्वानी वरतीत सहभाग घेतला. त्यामुळे या विवाह सोहळा चर्चा शहरात व या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
लग्नसोहळ्यात काळानुरूप झालेले बदल, यामुळे लग्नाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. संकेत चा लग्नसोहळा याला मात्र अपवाद ठरला .बैलबंडी दमणी सजविलेले, डीजे चे तालावर लग्न व्हराडी नाचत आनंद लुटला आणि लग्न सोहळ्याचा थाट पाहून मोबाईलच्या कॅमेराने बैलबंडीची ही वरात प्रत्येकजण टिपून घेण्यात गुंग होता.
विज्ञानाने विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती केली आहे. प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञाने व्यापले आहे. त्यामुळे काळानुसार विवाह पद्धतीतही आमुलाग्र बदल झाला आहे. हायटेक विवाह सोहळ्यामुळे लग्न खर्चात वाढ झाली आहे. मात्र तालुक्यातील चारगाव येथील काशीनाथ चौधरी यांनी आपला मुलगा नवरदेव संकेतची वरात चक्क स्वतः सजविलेले बैलबंडी वरून वधू मंडपी काढल्याने या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पारंपरिक विवाह सोहळ्याचे दर्शन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here