prabodhini news logo
Home चंद्रपूर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मेश्राम यांचा आम आदमी पार्टी मध्ये पक्ष प्रवेश

सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मेश्राम यांचा आम आदमी पार्टी मध्ये पक्ष प्रवेश

0
255

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर : आम आदमी पक्षाचे संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज बाबुपेठ मधिल नामांकित सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले तसेच भारत राष्ट्र समिती (BRS) चे माजी समन्वयक श्री. संजय उर्फ शशिकांत जी मेश्राम यांचा आपल्या कार्यकर्ते सह त्यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर आप चे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांचा नेतृत्वात आम आदमी पक्षात पक्ष प्रवेश झाला.

शशिकांत मेश्राम हे बाबुपेठ मधिल समता चौक, बाबा नगर, विकास नगर, अब्दुल हमीद चौक परिसरात प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक निराधार, अपंग, गोर- गरीब लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा, रेशन कार्ड, तसेच शासनाचा विविध योजनेचा लाभ ते गरजूना मिळवून दिले आहेत.

आज आम आदमी पक्षात प्रवेश करताना ते म्हणाले दिल्ली आणि पंजाब दोन्ही राज्यात वीज, शिक्षण, आरोग्य, महिला सबलिकरण, रोजगार, रस्ते वाहतूक, सर्व विभागात आम आदमी पार्टी चा सरकारने अतुलनीय कामगिरी केली असल्याने त्यांचा कामाशी प्रेरित होऊन आम आदमी पक्षात प्रवेश करत असल्याचे ते म्हणाले.

यावेळेस आप चे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, महिला महानगर अध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख, संघटनमंत्री संतोष बापचे, अल्पसंख्यांक महानगर अध्यक्ष जावेद भाई सय्यद, महानगर वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, युवा जिल्हा संघटनमंत्री अनुप तेलतुबडे, युवा सहसंघटनमंत्री मनीष राऊत, फहीम शेख, शकील पठाण, वकील मेश्राम इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here