
स्वप्निल मोहितकर
तालुका प्रतिनिधि
प्रबोधिनी न्युज भद्रावती
भद्रावती : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी सि.बी.एस.ई बोर्ड परिक्षेत येथील श्री साई कॉन्व्हेंट सी.बी.एस.ई. कुणाडा शाळेचा उत्कृष्ठ निकाल लागला असुन या वर्षी सुध्दा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परिक्षेत कु. गौरी गुंडावार हीला ८७.०६% गुण प्राप्त करून शाळेतुन पहिली आली आहे. तर व्दितीय क्रमांक राजेश्री वासेकर हीला ८५.४०% गुण प्राप्त केले. नैतिक लोहकरे ८३.८०% गुण प्राप्त केले. ओंकार कुत्तरमारे याला ८३% गुण मिळाले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अतुल बडकेलवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा कांता गुंडावार, मुख्याध्यापिक कु. किरण कोथळे, रुपाली नंदनवार, किरण साळवे आदी मान्यवराच्या उपस्थित विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विघार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक वृंद आणि आई -वडीलांना दिले आहे. संस्थेचे सचिव अतुल गुंडावार व रूपा गुंडावार यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.














