
वणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
वणी – समाजातील उपेक्षित घटकांना प्रेरणा मिळावी त्यापासून बोध घेऊन त्यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करत आपली व समाजाची परिस्थिती बदलावी यासाठी हा सत्कार सोहळा आम्ही घेत असतो असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विदर्भ प्रमुख संबा वाघमारे यांनी वणी येथील एसबी लॉन मध्ये (दि. १५ जून, शनिवार) घेण्यात आलेल्या गुणगौरव सोहळ्या कार्यक्रमात व्यक्त केले.
राजकारण करणे सोपे आहे; परंतु समाजकारण करणे कठीण ; कारण समाजामध्ये एकदा व्यक्तीची बदनामी झाली तर तो आयुष्यभर कायम राहते त्यातून तो सावरत नाही. परंतु राजकारणात असे नाही म्हणून अनेक पुढारी येथे कार्य करण्यास धजावत नाही. पण मी ही जोखीम पत्करून. वणी व विदर्भातील समाजाचे सशक्तिकर्णाचे कार्य हाती घेतले आहे आणि याची प्रचिती मला दिसत आहे. अशी भावना संबा वाघमारे यांनी विचारमंचावर बोलून दाखवली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघ तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, प्रमुख पाहुणे म्हणून आरसीएमचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमा खंडाळे, राज्य उपाध्यक्ष समिक्षा भटवलकर, अनिल काकडे, प्रदीप बोनगीरवार मोहन हरडे, अमर तांडेकर, गोतिशे , बाळकृष्ण राजूरकर, किरण देरकर ठोंबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप व मान्यवरांच्या हस्ते चर्मकार समाजातील दहावी व बारावी तसेच नुकतेच नीट तथा जेइई परीक्षा उत्तीर्ण आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाज बांधवांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. त्यावेळी समाज बांधवांचा आग्रह व वाघमारे यांचे कार्य बघून ते मागेल त्या पक्षाची आमदारकीची तिकीट मिळून देण्याचा प्रयत्न करू असा शब्द घोलप यांनी दिला.
दरम्यान दिवसभर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सकाळी वृक्षारोपण, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय वणी फळ वाटप, रामदेव मूकबधिर शाळा येथे गणवेश वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बोरकुटे तर प्रास्ताविक महेश लिपटे आणि आभार सुबोध बांगडे यांनी केले होते. सदर कार्यक्रमाला विदर्भातील बहुसंख्य समाज बांधवांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात राष्ट्रीय चर्मकार संघ तालुका वणी चे युवा महिला आणि जेष्ठ बांधवाने अथक परिश्रम घेतले होते.














