prabodhini news logo
Home चंद्रपूर सिंदेवाही येथे ऑटो टिप्पर व ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा संपन्न

सिंदेवाही येथे ऑटो टिप्पर व ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा संपन्न

0
320

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

स्वच्छ महाराष्ट्र अभियान २०२० मध्ये सिंदेवाही-लोणवाही नगर पंचायतीने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या कामगिरीबद्दल नगर पंचायतीला ऑटो टिप्पर व ट्रॅक्टर पुरस्कार रुपात भेट देण्यात आले होते. दरम्यान, पुरस्कारातील वस्तू नुकत्याच नगर पंचायतीला प्राप्त झाल्या असून,या वाहनांचा लोकार्पण सोहळा सिंदेवाही-लोणवाही नगर पंचायतीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कंकाळ, उपाध्यक्ष मयूर सूचक, बांधकाम सभापती दिलीप रामटेके, पाणी पुरवठा सभापती पंकज नन्नेवार, महिला व बालकल्याण सभापती पुजा रामटेके,वैशाली पुपरेड्डीवार नगर सेविका, नगर सेवक युनूसभाई शेख, अमृत मडावी, मीनाक्षी मेश्राम, अंजु भैसारे, नीता रणदिवे, अस्मिता जुमनाके, सुरज गायकवाड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here