
सुविद्या बांबोडे
जिल्हा संपादक
चंद्रपूर
चंद्रपूर, दि. 3 : 20 जून 2024 रोजी चिकनी यार्ड मध्ये अप मेन लाईन जवळ अनोळखी व्यक्तीचे शरीर बेशुध्द अवस्थेत असल्याची माहिती बल्लारशहा स्टेशन प्रबंधक यांनी दिली असता रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार श्री. कुळमेथे आणि पोलिस शिपाई श्री. भांगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच पुढील कार्यवाही करीता नमुद इसमास उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास ब्रॉथ डेड घोषित केले. सदर मयत अनेाळखी इसमाची अद्यापपावेतो ओळख पटली नाही. करिता सदरचे प्रेत हे उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील शवगृहात ठेवण्यात आले आहे. या मृत व्यक्तिची ओळख पटविण्यासाठी वारसदार / नातेवाईकांनी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मृतकाचे वर्णन : उंची अंदजे 5.7 फुट, वय अंदाजे 35 वर्ष , रंग निमगोरा, चेहरा चेंदामेंदा असलेला, बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे मध्यम, गोंदण नाही, अंगावर काळया रंगाचा फुल पॅन्ट, ग्रे रंगाचा शर्ट, निळया रंगाची सॅन्डो बनियान.
सदर अनोळखी मृतास कोणी ओळखत असेल किंवा त्याचे नाव, गाव, पत्ता, वारस, नातेवाईक बाबत काही एक माहिती मिळून आल्यास रेल्वे पोलिस स्टेशन वर्धा (मो.क्र. 7499967957) व तपासी अंमलदार श्री. कुळमेथे (मो.क्र. 7820932383) वर संपर्क करावा, असे रेल्वे पोलिसांनी कळविले आहे.














