
सोनाली घाडगे
महिला जिल्हा संपादक
पुणे
स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव गावातील लेक तथा पुणे येथे वास्तव्यास असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या शिवशंभू प्रिया जांभळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. नुकतीच पुणे येथे झालेल्या एका आयोजित छोट्या खाणी कार्यक्रमात स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या शिवशंभू प्रिया जांभळे यांना स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला दक्षता आघाडीच्या
प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र देण्यात आले यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघात माझी नियुक्ती केल्याबद्दल मी शिवशंभु प्रिया जांभळे स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष डॉ कृषी राज टकले निलेश धुमाळ, अनिल आदमने, शारदा पाटील, अनिता पाटील, अलका हरगुडे, ज्योती सातव, मीरा शिंदे अश्विनी सावंत वैशाली भैरट, सविता थोरात प्रतिभा, सीता पाटील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते अशी माहिती जांभळे यांनी आष्टी येथे आज मराठीशी बोलताना दिली पुढे बोलताना जांभळे यांनी सांगितले की आष्टी मतदारसंघातून आपण विधानसभा लढवणार आहोत असंही शेवटी बोलताना सांगितलं.














