
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन
रविंद्र मैंद
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज, ब्रम्हपुरी
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण रुपी शस्त्रानेच भविष्यातील संघर्षमय जीवनाला समर्थपणे सामोरे जाता येते. आज स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्यातील ज्ञानाची भूक वाढवून ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते ब्रम्हपूरी तालुक्यातील बेटाळा येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. नामदेवराव किरसान, डॉ.श्री विनोद जयस्वाल संचालक सारस्वत डायग्नोस्टिक व रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, डॉ.संजय ढोबळे वरिष्ठ प्राध्यापक भौतिक शास्त्र विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, संस्थेचे सचिव बेनिरामजी उदापूरे, सदस्या सौ.निता देवेंद्र पिसे, उद्योजक आदित्य पांधरे, राजेंद्र पिसे सदस्य,सौ.अनिता पिसे सदस्या, माजी प्राचार्य डॉ. कोकोडे ने.ही.महाविद्यालय ब्रम्हपुरी मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकारणे हेतू अधिक महत्त्वकांक्षी होणे गरजेचे आहे. आज सर्वत्र स्पर्धा सुरू असून सर्वच क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी देशातील प्रत्येक युवक सातत्याने प्रयत्न चालवीत आहे. अशा परिस्थितीत शिक्षण नगरी म्हणून ओळखली जाणारी ब्रह्मपुरीचे नाव सर्व दूर पोहोचले. शिक्षणाच्या या पंढरीचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवावे अशी आशा व्यक्त करीत राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन करीत आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व व उज्वल भविष्य घडवण्याच्या संधी यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
यानंतर नायपर परीक्षेत संपूर्ण देशातुन तीन विद्यार्थी ऑल इंडिया रँक घेऊन उत्तीर्ण झाले व गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
संचालन शैलवी चन्ने हिने केले आणि आभारप्रदर्शन सौ.अनिता पिसे यांनी केले.














