prabodhini news logo
Home चंद्रपूर रत्नापूर जि. प. शाळेत नवागताचा शाळा प्रवेशोत्सव व पुस्तक वितरण

रत्नापूर जि. प. शाळेत नवागताचा शाळा प्रवेशोत्सव व पुस्तक वितरण

0
226

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कार्यरत असून येथे वर्ग एक ते आठ पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.सन 2024 – 25 चे सत्र दिनांक 1 जुनपासून सुरु झाले असुन सर्व शिक्षण घेत असलेल्या व शाळेत पहिल्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी यांचा प्रवेशोत्सव पहिल्या दिवशी 1 जून ला मोठ्या उत्साहात गावातील मुख्य मार्गाने मिरवणुक काढुन व पु़ष्पगुच्छ देवून शाळेचे वतीने स्वागत करण्यात आले. तसेच शाळेत विद्यार्थीयांना पुस्तक वितरण करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश्वर लोधे,उच्च श्रेणी मुख्याध्यापक रेखा पंधरे, पदविधर शिक्षक दिनकर गायकवाड ,विषय शिक्षीका चंदा गुडवार, सहा. शिक्षक प्रदीप बद्देलवार, मिथुन रामटेके,,सोमेश्वर आत्राम,वैशाली कोवले, विकास राजुरकर, मोतीराम सोनकुसरे,रावणे,राउत यांचेसह शालेय विद्यार्थी व गावातील प्रतीष्ठीत नागरीक ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सहाय्यक सचिन ढोणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here