
रेणुताई पोवार
कोल्हापूर प्रतिनिधी
मुले हि देवा घरचे फुले असतात मुलांनी शिकुन मोठे व्हावे तसेच स्वताच्या पायावर उभे राहुन स्वताच चांगल्या प्रकारे करीयर करावे असे प्रत्येक शिक्षकांची व आई वडिलांची अपेक्षा असते विद्यार्थी हे शिक्षणात गुणवत्ता मिळाली कि त्यांना व त्यांच्या आई वडिलांना शिक्षकांना आनंद असतो ह्याच आनंदाचा भरभराटकरण्यासाठि
परमपूज्य माताजी निर्मला देवी प्रणित श्री. आदिशक्ती सामाजिक संस्था नवी मुंबईच्या वतीने कोपरखैरणे ध्यान केंद्रात उतीर्ण झालेल्या मुलांसाठी गुरुवार दिनांक 04.07.2024 रोजी बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला.यावेळि उत्कृष्ट प्रकारे सुत्रसंचाल श्री मुकादम साहेब यांनी केले इयत्ता नर्सरी ते ग्रॅज्युएट पर्यंत उत्तीर्ण झालेले 80 विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
श्री. आदिशक्ती सामाजिक संस्था गेली १७ वर्षे सतत हा कार्यक्रम राबवित आहे व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवीत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक सर्वांचे आभार..
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजय मुकादम, विनीत वेटा, वेद म्हात्रे, संकल्प म्हात्रे, वर्षा वेटा, रिया पाटील, प्रांजल पाटील, प्रथा पाटील यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. त्याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक प्रमुख पाहुणे काॅर्डिनेटर बाबु रणवरे यांनी आभार मानुन पुढच्या भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक अभिनंदन केले अशा प्रकारे 80
विद्यार्थ्यांचा गुणवत्ता उपक्रम उत्कृष्ट प्रमाणे गौरवण्यात आले.
यावेळी नवि मुंबई सहज योगा कमिटीच्या प्रमुख पाहुणे दिनेश फपाळे साहेब,नवी मुंबई सेवा कमिटिचे माजी मुख्य काॅर्डिनेटर बाबू रणवरे,तसेच 80 विद्यार्थीची उपस्थिती लाभली.














