व्याहाड (बुज) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
ग्रामीण भागातील नागरीकांना प्राथमिक उपचार मिळणे हेतू प्राथमिक आरोग्य केंद्रे शासनाच्या वतीने कार्यान्वित करण्यात आली. तर या केंद्रांमध्ये वेळीच उपचार मिळाला तर अनेकांचे जीव वाचणार. म्हणुन आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांची सेवा करून आपली ईश्वरीय सेवेची कर्तव्य पार पाडावी. असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) येथे नव्याने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
आयोजित लोकार्पण सोहळ्यास गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान, जिल्हा शलयचिकित्सक डॉ.चिंचोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कटारे,सावली तहसिलदार प्रांजली चरडे, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापति दिनेश चिटनुरवार, गटविकास अधिकारी वासनिक,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चौधरी, संतोष तंगडपल्लीवार, दिवाकर भांडेकर तसेच काँग्रेस कमिटी पदाधिकारी, कार्यकर्ते, तथा आरोग्य सेवा कर्मचारी वृंद व गावकरी प्रामुख्याने उपस्थीत होते.
यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, व्याहाड (बुज) व परिसरातील नागरीकांना उत्तम दर्जेची आरोग्य सेवा मिळावी याकरिता आपण शासस्तरावरून दिड कोटींचा निधी मिळविला. माञ बांधण्यात आलेली ही इमारत केवळ शोभेची वास्तू म्हणुन धूळखात न ठेवता त्याचा पुरेपूर वापर करून येथे उपचाराकरिता दाखल होणाऱ्या रूग्णांना आवश्यक आरोग्य सेवा, व प्रेम भावनेतून वागणूक देत शासन सेवेत आरोग्य सेवेचे ईश्वरीय कर्तव्य पार पाडावे. सोबतच येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांनी येथील डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समास्या जाणुन घेत लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच आपण संपूर्ण क्षेत्राचा सर्वांगीण विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही देखील यावेळी दिली. आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बहुतांश नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

