prabodhini news logo
Home ठळक बातम्या शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना तहसीलच्या कागदपत्रांची व दाखल्यांची होतेय गैरसोय – पत्रकार ज्ञानेश्वर...

शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना तहसीलच्या कागदपत्रांची व दाखल्यांची होतेय गैरसोय – पत्रकार ज्ञानेश्वर सैंदाणे

0
248

सोनाली घाटगे महिला उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – त-हाडी:-महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या जीआर मध्ये नमूद केलेल्या पात्रतेसाठी डोमसाईल व उत्पन्न दाखला आवश्यक असल्याने सांगितलं जात होते. अशातच शिरपूर तालुक्यातील लोकांची महा-ई-सेवा केंद्र व सेतू केंद्रामध्ये दाखले काढण्यासाठी महिलांची गर्दीचां जनसागर लोटला अनेकांनी लवकर दाखले काढून मिळेल अशी आशा दाखवून डबल चे पैसे घेतले वीस ते पंचवीस दिवस कागदपत्रे देऊन प्रोसेस झाले नसून अजून कोणालाही डोमसाईल उत्पन्न दाखला मिळाला नाही. शासनाने उत्पन्न दाखला डोमिसाईल या व्यतिरिक्त पर्याय म्हणून दुसरे कागदपत्रे ही चालतील. तेव्हापासून थोडाफार गर्दीवर नियंत्रण आल्याचे दिसून येत आहे.
परंतु सर्वात जास्त नुकसान शैक्षणिक कामासाठी लागणारे नॅशनॅलिटी डोमेसाईल उत्पन्न दाखला अशा कागदपत्रांना महिना उलटून गेला तरी मिळत नसल्याने शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र याचा खूप फटका बसला आहे. सध्या सुरू असलेल्या ऍडमिशन यामध्येही दाखल्यांची आवश्यकता असते कास्ट सर्टिफिकेट गरजेचे असते. यासाठी प्रशासनाने तात्काळ याचे दाखल घेऊन शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून लवकर दाखले देऊन त्यांचा मार्ग मोकळा करावा सेतू विभागाकडून सांगितलं जात आहे तीस हजार पेंडिंग ला दाखले पडून आहेत मग याची दाखल घेणार कोण तहसील विभागाने याची जबाबदारी दखल घेऊन तात्काळ जे दाखल्यांनसाठी अडचणी असतील सोडावेत अशी शिरपूर तालुक्यातील ग्रामस्थांकडून व विद्यार्थ्यांकडून विनंती केली जात आहे.

विद्यार्थ्यी अक्षय खोंडे त-हाडी – माझ्या शैक्षणिक कामासाठी कास्ट सर्टिफिकेट व उत्पन्न दाखला अर्जंट लागत आहे मी २० ते २५ दिवसापासून कागदाची पूर्तता केली आहे अजून मला दाखले मिळाले नाहीत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here