
सुविद्या बांबोडे जिल्हा जिल्हा संपादक चंद्रपूर – चंद्रपूर मुन्सिपल कॉर्पोरेशन ने हाती घेतलेली ‘आम्ही वृक्ष प्रेमी स्पर्धा 2024’ च्या वतीने ‘चंद्रपूर संघर्ष समिती’ ही सातत्याने पहिल्या दिवसापासून ते आज शेवटच्या दिवसापर्यंत सुरू झालेल्या मिशन प्रमाणे व त्यात नमूद केलेल्या अटींप्रमाणे इव्हेंट्स घेत आलेली आहे. त्या प्रत्येक इव्हेंट्स चे एव्हिडन्स म्हणून जे जीपीएस मॅप कॅमेरा द्वारे काढण्यात आलेले फोटोज आणि जाहिरातीसाठी वर्तमानपत्राद्वारे जे लेख लिहिण्यात आलेले आहे ते सर्व साक्षी कार्लेकर मॅडमच्या ऑफिसमध्ये लगेचच, प्रत्येक इव्हेंट्स संपल्यानंतर त्याच दिवशी, पाठवीत आलेलो आहोत.
आज मी अशोक पूर्णये आणि जीवनकर, साक्षीच्या कार्यालय ला जाऊन तिथे आपण पाठवीत असलेले फोटोज आणि वर्तमानपत्राची लेख व्हेरिफाय केले. ते सर्व फोटोज त्यांच्या ऑफिस कॉम्प्युटर मध्ये सीबीएससीच्या फाईलच्या अंतर्गत पाहायला मिळाले.














